बार्शी – भीमनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी धीरज ऊर्फ सोमनाथ बोकेफोडे यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी निवडीबाबत भीमनगरमध्ये झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अशोक बोकेफोडे होते. यावेळी माजी नगरसेवक बब्रुवान अय्यर, दीपक बोकेफोडे, सूर्यकांत लोंढे, संतोष बोकेफोडे, ऍड. प्रसन्नजीत नाईकनवरे, बंटी गायकवाड, रुपेश बंगाळे, आबासाहेब बोकेफोडे उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्षपदी गोविंद शेंडगे, सचिवपदी अक्षय बोकेफोडे, खजिनदारपदी प्रफुल्ल बोकेफोडे, सहसचिवपदी सत्यपाल बोकेफोडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.























