अक्कलकोट – तालुक्यातील नागणसूर येथील एच. जी. प्रचंडे माध्य. व उच्च माध्यमिक प्रशालेत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहावे व विविध व्यवसायाचे मार्गदर्शन घेऊन आत्मनिर्धाराने वाटचाल करावी. असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य शंकर व्हानमाने यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला सप्ताहाच्या समारोपप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका सौ सुनीता बंदी छोडे हे होते. यावेळी मुलीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आरोग्य तपासणी केली यात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त प्रशालेत चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी व्यासपीठावर सहशिक्षक बसवराज धनाशेट्टी, प्रीती प्रचंडे, वृषाली सोनटक्के प्रमिला शिव गोंडा, जयश्री प्रचंडे, सौ. करोटे सौ डोंगरीतोट, श्रीमती अर्चना मनुरे आधीजण उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुमार गंगदे, प्राध्यापक ईरण्णा धानशेट्टी, अनिल इंगळे, प्रशांत नागुरे, शरणप्पा मनुरे, बसवराज कोळी, थावरू चव्हाण, आकाश कोनापुरे, नितीन धानशेट्टी, विश्वनाथ तळवार, माणिक किणगी, सागर पोद्दार आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ वाघमोडे यांनी केले तर, प्राध्यापक चिदानंद मठपती याने सर्व उपस्थिताचे आभार मानले.























