वळसंग – दक्षिण सोलापूर येथे टाटा व्हॉलिटरिंग वीक २५ चे औचित्य साधून टाटा पॉवर चे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच स्वामी समर्थ सेवा मंडळाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलाचे वेगवेगळे आनंदी खेळ घेऊन हळदी कुंकू समारंभ हा होम मिनिस्टर स्पर्धेच्या धरतीवर महिलांचा सन्मान करण्यात आला.
सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक भाषणात टाटा टाटाव्हॉलिटरिंग वीक चे महत्व सांगून अनोखा धागा ह्या महिला सबलीकरण उपक्रमाविषयी श्री. विश्वास सोनवले ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानिमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर आनंदी खेळ स्पर्धेत आशा वर्कर वैशाली दुधगी या महाविजेत्या ठरल्या आहेत. त्यांना प्रतीक ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले तर वैशाली बनसोडे यांना स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून मानाची पैठणी देण्यात आली.
इतर सात स्पर्धकांना टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई यांच्याकडून मानाची साडी भेट देण्यात आली. यामध्ये श्रुती विजय पिसे, पुनम अक्षय सावंत, कलावती शंकर खैराटे, रेखा अंशुमन विधाते, अनुराधा पाटील, सुरूवाई धडुते, ऋतुजा कारभारी यांचा समावेश होता. सहभागी सर्व महिलांना स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून ब्लाउज पीस व गुलाब पुष्प देण्यात आले. सर्व उपस्थित महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान टाटा पॉवर च्या अधिकाऱ्यांनी फेटा बांधून महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी टाटा पॉवरचे सी एस आर विभाग अधिकारी श्री विश्वास सोनवले, स्टेशन हेड श्री दत्तात्रय बस्तापुरे व श्री. विजय पिसेसह इतर कर्मचारी वृंद, सरपंच जगदीश अंटद, सरपंच सौ. विश्रांती पाटील, स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी, कार्याध्यक्ष महादेव होटकर, सचिव सिध्दारुढ काळे, सन्मुख स्वामी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यशवंत गायकवाड, प्रतिभा दुधगी, दिनकर नारायणकर, अजय काळे यांनी परिश्रम घेतले. आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका रश्मी मोहोळकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
























