माळशिरस : येथील श्री रामदेव श्री मारुती देव मंदिरात एकनाथ षष्ठीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ह भ प भागवत महाराज जाधव (खोरोची) यांनी कीर्तन सेवा बजावली.
एकनाथ षष्ठी निमित्त मंदिरात सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ह भ प भागवत महाराज जाधव यांचे कीर्तन झाले या कीर्तनात त्यांनी एकनाथ महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले त्यानंतर दुपारी बारा वाजता एकनाथ महाराजांच्या प्रतिमेवर फुले टाकून एकनाथ षष्ठी साजरी करण्यात आली.
यावेळी मंदिरात कार्यक्रमासाठी नागरिकांनी व भाविकांनी गर्दी केली होती यात महिलांची संख्या लक्षणीय होती कार्यक्रमानंतर ॲड मिलिंद कुलकर्णी यांच्या वतीने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला























