सोलापूर : कै.गंगाराम देशमुख मनपा प्राथमिक शाळा देशमुख वस्ती शाळेस प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांच्या सहकार्यातून युवा उद्योजक सुमित पंपटवार यांच्याकडून शाळेत 2 साऊंड बॉक्स भेट देण्यात आले.
मनपा देशमुख वस्ती शाळाचा लोकसहभागातून विकास होत आहे.
प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांनी आपल्या मनोगतातून शाळेत सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील, सहशिक्षक उमेश युवनाती , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सविता माळवदकर,सहशिक्षक प्रकाश अनभुले उपस्थित होते. सूत्रसंचालन नागेश गोसावी यांनी केले तर आभार संतोष सुतार यांनी मांडले.

























