वेळापूर – येथील वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महिला पोलीस कर्मचारी सोनाली सोनवलकर, कविता आवताडे, सोनाली शिंदे, प्रियंका सुर्यवंशी, नसीमा मुलाणी, स्वाती लोंढे, वैष्णवी बाबर यांचा वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रभारी अधिकारी आशिष कांबळे म्हणाले की, महिला या समाजाचा मजबूत आधारस्तंभ आहेत. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात धाडस, कर्तृत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण करत आहेत. पोलीस दलातही महिला अधिकारी व कर्मचारी अत्यंत जबाबदारीने कर्तव्य बजावत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कुटुंब, समाज आणि नोकरी या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्या उत्कृष्ट कार्य करत आहेत. महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल आनेकांनी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास वेळापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

























