Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांना ज्ञानदिप पुरस्कार जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांना ज्ञानदिप पुरस्कार जाहीर
0
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – परमपुज्य थोर स्वामी भक्त कै.ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेच्या वतीने दरवर्षी ज्ञानदीप पुरस्कार दिला जातो. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, व विविध क्षेत्रांमध्ये समाज जीवन उजळविणाऱ्या प्रतिभावान व्यक्तीमत्वास वर्षाचा ज्ञानदीप पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील तसेच श्री स्वामी समर्थांच्या सेवेतील योगदानाची दखल घेवून महेश इंगळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी दिली. 

          नुकतेच श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीने थोर स्वामी भक्त प.पू.कै.ज्ञानेश्वर हरी काटकर  यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा ज्ञानदिप पुरस्कार स्विकारण्यास उपस्थित राहण्यासंदर्भांत  श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात नगरसेवक व चेअरमन महेश इंगळे यांची भेट घेवून निमंत्रण व निमंत्रण पत्रिका दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले बोलत होते.

          पुढे बोलताना अध्यक्ष नारायण बुधले यांनी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात भारत भ्रमण करून जगाचा कल्याणाचा ध्यास घेत अध्यात्माचा मार्ग भाविकांना दाखविला. स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण अक्कलकोट मध्ये येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे. 

अशा या पवित्र ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी आपले वडील कै.कल्याणराव-बाळासाहेब इंगळे यांच्या अध्यात्मिक संस्कारातून श्री स्वामी सेवेचा वसा समर्थपणे सांभाळाला आहे. भक्तांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून सामाजिक भान जपले आहे. स्वामींचा महिमा सर्व दूर व्हावा यासाठी अविरतपणे श्रीवटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती कार्यरत आहे.

त्यामुळे या ट्रस्ट द्वारे होणाऱ्या योगदानाची दखल घेऊन व त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन येत्या दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर कोल्हापूर येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांना यंदाच्या ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रुपये रोख एक लाख रुपये असे आहे, तरी सन्माननीय महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाचे वतीने देण्यात येणारा आमचा ज्ञानदीप पुरस्कार स्वीकारून आमच्या पुरस्कार वितरण सोहळ्याची व श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्या वतीने स्वामी प्रकट दिन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी असेही मनोगत श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले यांनी केले आहे. यावेळी प्रकाश चव्हाण, जयसिंग जाधव, सुहास घाटगे, विरेश पांचाळ, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, श्रीशैल गवंडी आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.

(चौकट – आपणांस लाभणारा ज्ञानदीप पुरस्कार हा परमपूज्य काटकर साहेबांचा एका प्रकारे आशीर्वादच आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आणखीन जोमाने स्वामी सेवा करण्यास मानसिक बळ मिळेल, तसेच पुरस्काराच्या माध्यमातून प्राप्त होणारा  रक्कम रुपये एक लाख रुपयांचा धनादेश हे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यासाठी वापरण्यात येईल – श्री.महेश क.इंगळे – चेअरमन तथा नगरसेवक श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट) 

(चौकट – यापूर्वीही ज्ञानदीप पुरस्कार सन २०२३ साली महाबळेश्वर येथील सनराइज् कॅन्डल्सचे संस्थापक डॉ. भावेश भाटिया, सन २०२४ चा पुरस्कार भारतीय सैन्य दलातील स्वयंसिद्धा सुमेधा चिथडे, सन २०२५ चा पुरस्कार मुंबई येथील जे.जे.हॉस्पिटलचे नेत्र विभाग प्रमुख व १,६३,०००/-  एक लाख त्रेसष्ट हजार यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करणारे निष्णात सर्जन डॉ.तात्याराव लहाने यांना देण्यात आले आहे. – नारायण बुधले – अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ, प्रज्ञापूरी, कोल्हापूर) 

फोटो ओळ –  ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा व श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नगरसेवक महेश इंगळे यांना देताना अध्यक्ष नारायण बुधले, प्रकाश चव्हाण, जयसिंग जाधव, सुहास घाटगे, विरेश पांचाळ व अन्य दिसत आहेत.

Post Views: 179
Previous Post

पिलीव येथे व्हर्च्युअल क्लासरूम चे उद्घाटन. #public #marathinews #viral

Next Post

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करा

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करा

ताज्या बातम्या

मेटाच्या टीमने मागितली केंद्र सरकारची माफी #viral #news #marathinews

August 6, 2026

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1030385

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!