बार्शी – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कामगार व कुटुंबीयाकरिता विविध उपक्रम व आर्थिक योजना राबवित असते यातील एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अश्विनी कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथील महिला कामगारांचा उत्कृष्ट रुग्ण सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी कामगारांचे मनोबल वाढविण्याकरिता कुर्डुवाडी येथील प्रसिद्ध डॉ. जयंत करंदीकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते. मानवता हाच धर्म असून रुग्णाची सेवा हीच ईश्वर सेवा समजावी व आपले कर्तव्य प्रामाणिक करावे, असे डॉ. करंदीकर यांनी सांगितले व सर्वांनी व्यसनापासून दूर राहाण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी हिंगमिरे कॅन्सर प्रोजेक्ट हेड डॉ. संपदा कुलकर्णी, रोहित शिंदे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन समाधान भोसले, सोलापूर जिल्हा कामगार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी केंद्राचे संचालक बाळासाहेब आंधळकर यांनी राहुल ओहळ, गायत्री पाटील व उमा तांबे यांच्या सहकार्यने केले होते. कार्यक्रमाची सुरुवात कॅन्सर हास्पिटलचे संस्थापक डॉ. नेने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमास पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

























