सांगोला – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस या परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त केले. या परीक्षेत एकूण २०२ पैकी १७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५० पेक्षा अधिक ३, १४० पेक्षा अधिक १८, १३० पेक्षा अधिक ३५, १२० पेक्षा अधिक ६३, ११० पेक्षा अधिक ९९ तर १०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे १२८ विद्यार्थी आहेत. सुबोधिनी गुंडोपंत इंगवले हिने १५६ गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला.
सदर विद्यार्थ्यांना निलेश जंगम, नामदेव खंडागळे, सिताराम राऊत या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांसह पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ऍड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदिप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या परंपरेप्रमाणे प्रतिवर्षी विद्यार्थी या परीक्षेमधून जवळपास ५० लाखांच्या आसपास शासकीय शिष्यवृत्ती संपादन करत असतात.



























