सोलापूर – जि प प्रा शाळा कोरवली शाळेची स्थापना 9 मार्च 1909 रोजी झाली होती. त्याचे औचित्य साधून शाळेचा स्थापना दिवस व वार्षिक स्नेहसंमेलन शाळेने आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सुज्ञानी पाटील होत्या व कामती पोलीस स्टेशन चे API बसवेश्वर जकीकोरे यांचे शुभहस्ते उदघाटन झाले. प्रारंभी जि. प. सदस्या विमल खताळ यांचे चि. अक्षय खताळ व पं. स. सदस्या कोमल आवताडे यांचे पती अंकुश आवताडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले.
याप्रसंगी कामती पो. स्टे. ला नियुक्त API बसवेश्वर जकीकोरे साहेबांचा व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. बालचमुचा नृत्य अविष्कार व कला उत्तम होत्या. रसिक प्रेक्षकांनी भरभरून बक्षीस देऊन कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी अतुलकुमार माने, केंद्र प्रमुख बी डी राठोड, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व मेंबर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, पोलीस पाटील, आजी माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सीता पाटील, सुहास पाटील, संतोष माळगोंडे, अभिजित ननवरे, जगदेवी यादव तसेच गावातील व केंद्रातील सर्व शिक्षकानी परिश्रम घेतले.


























