सोलापूर – जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस रुग्णालय, सोलापूर शहर पोलीस मुख्यालय या ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य शिबिरा करिता इंडियन कॅन्सर सोसायटी सोलापूर, अधिष्ठाता वैश्यपायन मेडिकल कॉलेज सोलापूर, वैद्यकीय अधीक्षक सिविल हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती.
या आरोग्य शिबिरा करिता पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त, गुन्हे डॉ.अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुरी यांचे मार्गदर्शन तसेच पोलीस रुग्णालय येथील डॉ. गायकवाड व सर्व वैद्यकीय स्टाफ आणि महिला शाखा येथील पोलीस अधिकारी कर्मचारी, इतर शाखेचे पोलीस महिला पोलीस निरीक्षक व अधिकारी यांचे सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

























