सांगोला – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा आणि आई वडिलांचा सन्मान करायला हवा हीच खरी बहादुरी आहे. तसेच आधुनिकतेचा स्वीकार करत असताना मुलींनी सक्षम होऊन आपली संस्कृती जपली पाहिजे. विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा वापर जपून करावा, कारण आजच्या युवा पिढीचा मेंदू समाजमाध्यमांमध्ये अडकतोय असे मत कवयित्री गुंजन पाटील यांनी व्यक्त केले. त्या सांगोला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष बाबूरावभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, सदस्य महादेव झिरपे, विश्वनाथ चव्हाण, शामराव लांडगे, सुरेश फुले, सुधीर उकळे, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, वैजिनाथ घोंगडे उपस्थित होते. यावेळी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक, विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी, विविध विभागातील यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनामध्ये शेलापागोटे कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.सुरेश भोसले, रांगोळी व मेहंदी स्पधेचे उद्घाटन ऍड.उदयबापू घोंगडे तसेच भिंतीपत्रकाचे उद्घाटन गुंजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परीक्षक डॉ.विजयकुमार गाडेकर, कला शिक्षक प्रशांत मिसाळ, सहशिक्षिका श्रध्दा तेली, स्मिता इंगोले, प्रा.रोशनी शेवाळे, आरती बेंगलोरकर, नगरसेविका सुजाता केदार, आशादेवी यावलकर, माजी नगरसेविका शोभा घोंगडे यांचेसह सेवानिवृत्त प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुरेश भोसले, अहवाल वाचन डॉ.विद्या जाधव, पाहुणे परिचय डॉ.रामचंद्र पवार, सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे, प्रा.प्रसाद लोखंडे यांनी केले. आभार डॉ.अमोल पवार यांनी मानले. हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे, प्रा.स्वप्निल शहा, प्रा.सोनल भुंजे, डॉ.भारत पवार, अधिक्षक विलास माने यांचेसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

























