पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष पिलीव व महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलचयावतीने पिलीव येथील मसजीदीमधये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी पिलीव गटाचे माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, भारतीय जनता पक्ष माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहीते, पिलीव शहराध्यक्ष प्रमोद भैस, भाजपचे नेते उमेशभाऊ सरवदे, तालुका उपाध्यक्ष डॉ निलेश कांबळे, नितीन कपने, शिवप्रसाद पुकळे, सचिन भैस, जितेंद्र पाटील, अंकुश भैस, योगेश देशमुख, फिरोज शेख, नजीर मुलाणी ,मौलाना मुजमील तांबोळी, संतोष झेंडे, शिंगोर्णी चे युवा नेते प्रवीण कदम, बाजीराव जाधव, असिफ पठाण, जमीर तांबोळी यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती व आसपासच्या गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीस उपस्थित होते .
पिलीव येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीस उपस्थित मान्यवर व समाजबांधव.

























