सोलापूर : डॉ.व्ही.एम.मेडिकल कॉलेज कर्मचारी सह. पतसंस्थेने आपल्या पारदर्शी स्वच्छ व विना राजकारण कारभार करीत पन्नास वर्षे इतका मोठा कालखंड गाठला आहे. तीच विश्वासार्हतक वाटचाल आजही चालु आहे. सहकार क्षेत्रातील हे विरळा उदाहरण असावे असे गौरवोद्गार माजी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी काढले.
हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्तच्या जाहीर समारंभात अध्यक्षस्थानावरुन डॉ घाटे मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर श्री.छ.शिवाजीमहाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्वीक जयकर, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डि. टी. जोशी, कवी- देवेंद्र औटी, रमाकांत फुटाणे उपस्थित होते.
प्रारंभी डि. टी जोशी यांनी स्थापनेपासुनचा सर्व इतिहास सविस्तर मांडला. यावेळी आर.आय.तळे, बी. टी जोशी, रविंद्र नायडु,वाय.आर पांढरे,,विद्यमान चेअरमन सौ.वर्षा कमटम,यांचेसह संचालक मंडळ सर्व सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन कवी देवेंद्र औटी यांनी केले. आभार संस्थेचे लिपीक एम. एन. बोलाबत्तीन यांनी मानले.























