Friday, May 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक

तरुण भारतbyतरुण भारत
March 17, 2026
in editor
0
खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक पार्श्वभूमी या वृत्तपत्राविरोधात गंभीर आरोप समोर आले असून, 1996 ते 2020 या कालावधीत आरएनआय प्रमाणपत्राशिवाय हे वृत्तपत्र प्रकाशित करण्यात आल्याची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते दीपक श्रीकृष्ण शेळके यांनी आज सोमवार (दि 16) पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. दरम्यान, उपचिटणीस जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती अधिकारी, जालना यांनी दखल घेत योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपोषकर्ते दीपक शेळके यांना दिले. जवळपास 10 तासानंतर रात्री उशिरा 8 वाजता आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, गेल्या दहा वर्षांपासून म्हणजे सन 2016 पासून जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हाधिकारी, महासंचालक यांना वेळोवेळी दैनिक पार्श्वभुमी संदर्भात निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात येत होती. मात्र, अद्यापही कारवाई होत नसल्याने श्री शेळके यांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, जालना येथून प्रकाशित होत असलेले वृत्तपत्र दैनिक पार्श्वभुमी हे 1996 पासून विना आरएनआय प्रमाणपत्राशिवाय प्रकाशित करण्यात येत होते.

महत्त्वाचे म्हणजे कोणतेही वृत्तपत्र आरएनआय नसतांना शासनमान्य जाहिरात यादीत समाविष्ट केले जाऊ शकत नाही. असे असतांना दैनिक पार्श्वभूमीने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कथितरीत्या खोटी कागदपत्रे सादर केली आणि शासनाची दिशाभूल करून शासन मान्य जाहिरात यादीत स्थान मिळविल. या माध्यमातून शासनाच्या तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद लघु पाट बंधारे विभाग, पुनर्वसन आदी विविध शासकीय विभागांकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळविल्या आहेत. त्यामुळे 1996 ते 2020 या कालावधीत शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती या वृत्तपत्राला देण्यात आल्या असून, हा संपूर्ण व्यवहार नियमबाह्य आहे.


याशिवाय, या वृत्तपत्राच्या छपाईबाबतही गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे. सुमारे 23 हजार प्रती छापल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात तीन हजार प्रतीदेखील छापल्या जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित प्रिंटिंग प्रेसची क्षमता, वीज बिल तसेच प्रत्यक्ष छपाईची नोंद तपासून चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.


या संदर्भात ता. 16 ऑगस्ट 2016, 18 ऑक्टोबर 2017 आणि 27 फेब्रुवारी 2018 रोजी तसेच ‌‘आपले सरकार‌’ पोर्टलवरूनही तक्रारी करण्यात आल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास 12 जानेवारी 2026 रोजी आंदोलनाचा ईशारा दिला होत. मात्र, त्यादरम्यान निवडणुका आणि आचार संहिता असल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. हे उपोषण सोमवार (दि 16) पासून सुरु करण्यात आले होते.


दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फसवणूक व शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई करावी, तसेच संबंधित वृत्तपत्राला शासन मान्य जाहिरात यादीतून वगळावे व जाहिरातींच्या माध्यमातून मिळालेली कोट्यवधींची रक्कम वसूल करावी, अशा मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसलेले दीपक शेळके यांना जिल्हा माहिती अधिकारी जालना यांनी रात्री 8 वाजेच्या सुमारास पत्र देत योग्य ती कायदेशीर कारवाईसाठी लवकरात लवकर पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करण्याचे आश्वासन देऊन ज्यूस पाजून उपोषण थांबविण्यात आले.


उपोषणादरम्यान शहरातील विविध पत्रकारांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपक शेळके यांनी भेट घेत उपोषणास पाठींबा दिला. यात प्रामुख्याने आमआदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ए. जी. कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे सुरेश खंडाळे, विनोद यादव, आर. एस. बोर्डे, नंदु रामरख्या, भरत मानकर, दर्पण सकलेचा, आमेर खान, सुहास वैद्य, साहिल पाटील, सुनील भारती, सिताराम तुपे, पी.एस. भालेराव, संतोष भुतेकर, राजेश भिसे, संतोष जाधव, शेख उमर, ओमप्रकाश शिंदे, शिवाजी शिंदे, सुशीलकुमार वाठोरे, शेख इलियास अब्बास, अशपाक पटेल, बासित बेग, शेख सलीम, सचिन सर्वे, राहुल मुळे, शेख रुस्तम शेख शमशोद्दीन, अजहर शेख मिया, शेख मुजीबुद्दीन, विकास गावंडे, संदीप भाकरे, महेश सारणीकर आदींनी भेट देत उपोषणास पाठींबा दिला.

उपोषण थांबले; पाठपुरावा सुरुच राहील – दीपक शेळके
उपोषकर्ते दीपक शेळके यांनी आज उपचिटणीस जिल्हाधिकारी जालना व जिल्हा माहिती अधिकारी जालना यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले असले तरी पुढे पार्श्वभुमी वृत्तपत्रावर कारवाई करण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा सुरु राहणार असल्याची प्रतिक्रिया उपोषकर्ते दीपक  शेळके यांनी दिली. आगामी दोन महिन्यांच्या आत कारवाई न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणा करण्यात येणार असल्याचे श्री शेळके यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 34
Previous Post

आता एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक – हॉटेल संचालक

Next Post

कै.कल्याणराव इंगळे उद्यानाचे लोकार्पण व अर्ध पुतळ्याचे अनावरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कै.कल्याणराव इंगळे उद्यानाचे लोकार्पण व अर्ध पुतळ्याचे अनावरण

कै.कल्याणराव इंगळे उद्यानाचे लोकार्पण व अर्ध पुतळ्याचे अनावरण

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

May 1, 2026

मनपात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2026

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एनसीएमसी कार्ड शिबिर कामगार व शिक्षकांचा गौरव

May 1, 2026

एकनिष्ठतेने कार्यकेल्यास राष्ट्राच्या प्रगतीला चालना डॉ प्रकाश महानवर

May 1, 2026

ज्येष्ठांना प्रवास मोफत मग स्वच्छता अधिभारचे दोन रुपये का नागरिकांचे सवाल

May 1, 2026

इतिहास सांगणाऱ्या महानगरपालिकेला ६२ वर्षे पूर्ण

May 1, 2026

बापरे मुंबईच्या तिकिटाला मोजावे लागणार १४ हजार

May 1, 2026

बालविवाह प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

May 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0840110

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697