जालना – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात महिला
दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचारी, महिला डॉक्टरांचा उपजिल्हाधिकारी चाटे व अधीक्षक डॉ.एस.झेड. गवारे सह प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.सईदा अफरोज, सह विभागप्रमुख डॉ.
वर्षा देशमुख, वर्ग १ स्त्री रोग तज्ञ डॉ. प्राची तारसेट्टीवर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या कार्यकामासाठी कार्यालयाच्या वतीने बालरोग विभागप्रमुख डॉ. पियुष होलांनी, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष राऊत,डॉ. अमोल लोंढे,स्त्री
रोग तज्ञ डॉ. आश्विनी मिसाळ, डॉ. शीतल भगत,डॉ. प्रवीण ससाणे, डॉ.पाटील, डॉ. स्मिता गायकवाड,डॉ.स्वाती, डॉ. तौर,डॉ. पालवे, डॉ. घुले,
सुरक्षाप्रमुख दीपाली खरात, खार्डे,मोहम्मद,रेणुका, औषध निर्माण अधिकारी राजेश्री पंडित,जानकर सिस्टरसह सर्व वैद्यकीय अधिकारी,आशिष भालटिलक,डॉ. रिना मेश्राम,मेट्रॉन व सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. सकाळी सर्व
महिला कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी चाटे यांनी रुग्णालयातील विविध कक्षाची पाहणी केली व उपस्थित डॉक्टर, महिला सिस्टर यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आडअडचणी समजावून घेतल्या.स्वच्छ सुंदर रुग्णालय पाहून उपजिल्हाधिकारी यांनी
समाधान वेक्त केले. तसेच प्रसूती विषयक सेवा या अतिशय उत्तम देत असल्यामुळे रुग्णालय प्रशासक व सर्व रुग्णालयीन अधिकारी व आधिपरिचारिका,
इन्चार्ज सिस्टर व कर्मचारी यांचे कौतुक केले. या महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला अधीक्षक डॉ. गवारे यांनी रुग्णालय,विविध सेवेबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ.वर्षा देशमुख यांनी रुग्णालयामार्फत राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती दिली.
उत्कृष्ट कार्य करणार्या डॉक्टर व महिला कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सत्कारमूर्ती संगीता पाटोळे -आठवले यांनी मनोगत व्यक्त केले की, या कार्यक्रमामुळे आमचा कामाचा उत्साह वाढतो. अधिष्ठाता डॉ. सईदा अफरोज
यांनी महिलांना कार्यासह आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल रुग्णालयातील मेट्रॉन रिटा खालँग्रीकर,विद्या पवार,सुनिता घोरपडे,बारगळ,पिंपोळे,सलिमा शेख, गडकरी, कुलकर्णीसह सर्व महिला कर्मचार्यांन रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. या
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शहानावाज अहमद,अविनाश जाधव यांनी केले तर आभार
प्रदर्शन श्रीकांत करांजकडे यांनी मानले.
कार्यालयीन अधीक्षक द्वारकास चव्हाण, विजया बर्डे, आशा देशमुख,आशा मोरे,मंगेश मोरे,अनिकेत जगताप,आकाश वानखेडे,आशिष जाधव व विशाल खांडेभराड, शुभम चव्हाण यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले.
कामाची जबाबदारी देतात म्हणून कामाची ऊर्जा वाढते २०१३ पासून काम केले,
परंतु कोणीही कामाची पावती दिली नाही. तुम्ही कामाची जबाबदारी देतात, मार्गदर्शन करतात म्हणून काम जास्तीत जास्त करण्याची इच्छा
होते,इथून पुढे सुद्धा असेच काम करत राहणार, असल्याचे अधीक्षक डॉ.एस.झेड.
गवारे यांना उद्देशून अधिपरिचारिका संगीता पाटोळे आठवले म्हणाल्या.
७- जिल्हा स्त्री रुग्णालयात महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचारी व
डॉक्टरांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



























