जालना – समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जालना शहरात 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी होणार आहे. यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त जालना शहर महानगरपालिकेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर 11,199 लाडुचे वाटप होणार आहे.
यानिमित्त जूना जालना कॅपीटल कॉम्प्लेक्स येथे सोमवारी (दि.16)मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीत कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
महाप्रसाद वाटप समिती खालीलप्रमाणे- अध्यक्षपदी अमोल धानुरे, कार्याध्यक्षपदी शिवकुमार राऊत, उपाध्यक्षपदी दीपक वैद्य,बाबासाहेब सोनवणे, रमेश मुळे, सचिव अमरदीप शिंदे,सहसचिव राहुल रायकर, संयोजक सुधाकर निकाळजे, संदीप हिवराळे, स्वप्नील गायकवाड, निखील पगारे, फिलीप्स उगले, प्रदिप मघाडे, बाबा पठाण,मधुकर झरेकर, सदस्य- बाबासाहेब बडदे, शंकर घोडके, संतोष जमधडे, डॉ. श्रावण शेवाळे, ॲड. अर्शद बागवान, ज्ञानेश्वर धानुरे, गणेश वाघमारे, गंगुबाई वानखेडे, भीमराव खांडेभराड, सुभाष सातपुते, वैजिनाथ नागरे, वंदना खांडेभराड, सुरेश रत्नपारखे, कडुबा वाकीकर, मधुकर झरेकर, शांतवन खांडेभराड, संजय इंगळे, बबन खरात वाघु्रळ, गणेश तरासे, नागेश राऊत, रामचंद्र फुलझाडे, नितीन इंगळे, बाळासाहेब तिडके,व्यवस्थापक अध्यक्ष इब्राहिम शेख, व्यवस्थापक संचालक बाबासाहेब वानखेडे, लक्ष्मण इधाटे, शंकर तारो, गोकुळ स्वामी, नितीन तायडे, अनिल वाघमारे, रविंद्र हेलगट, रविंद्र मगरे, संदीप डोंगरे, देवानंद डोईफोडे, सचिन वानखेडे, नंदकुमार क्षिरसागर, विठ्ठल बोरकर, शिवाजी खांडेभराड, गजानन खांडेभराड, शांतीराम खांडेभराड, अर्जुन पाथरकर , गणेश खरात, संदीप बाबासाहेब तिडके, दशरथ तोंडुळे, लक्ष्मीनारायण कदम, राजेंद्र शिंदे, विनोद भालेराव, सुरेश दांडगे, दिलीप मुळे, शिवलाल घाडगे, गौतम वानखेडे, अशोक खांडेभराड, रामेश्वर खांडेभराड, यांचा समावेश आहे


























