सांगोला – महाविद्यालयातील मराठी विभागामध्ये कार्यरत असलेले सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.संतोष मारूती लोंढे यांना प्रतिष्ठा फौडेशन, महाराष्ट्र यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
तासगाव, जि.सांगली येथे दि.२१ मार्च रोजी होणाऱ्या दशक महोत्सवी प्रतिष्ठा साहित्य संमेलनामध्ये विचारवंत प्रा.डॉ.बाबूराव गुरव, यशदा पुणेचे उपसंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, माजी खा.संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
एक शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून प्रा.संतोष लोंढे यांची ख्याती आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




















