पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळा कुसमोड, जि प शाळा लक्ष्मीनगर, लेंगरेवस्ती व पवारवस्ती-कुसमोड या चारही शाळांना विरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे सि एस आर फंडातून शंभर बॅचेस देण्यात आला .याचा आज कंपनीचे रिजनल मॅनेजर विजयकुमार कुंभार, जगदीश पाटील, राजु करे,संग्राम वाघ, सत्यवान जाधव यांच्या उपस्थितीत सदरच्या बॅचेसचे चारही शाळांना वाटप करण्यात आले .प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डाॅकटर सुरेश सातपुते यांनी याबाबत विशेष पाठपुरावा केला .या कार्यक्रमास माजी सरपंच तुषार लवटे, माजी सरपंच महावीर धायगुडे, बाळकृष्ण धायगुडे, हनुमंत धायगुडे, अज्ञान धायगुडे, अर्जुन वाघ, विजय धायगुडे, औदुंबर डोंबे, शशिकांत घड्याळे, गणेश लेंगरे, तेजस पवार, विश्वास धायगुडे, सतीश व्होनमाने, अक्षय सातपुते, मेजर संजय धायगुडे, सुभाष जाधव, सुभाष लेंगरे ,माऊली वाघ,बंटु कबाडे, नितीन लेंगरे ,लक्ष्मीनगर शाळेचे मुख्याध्यापक सुनिल डुरे, लेंगरेवस्ती शाळेचे विजय धायगुडे, कुसमोड शाळेचे गणेश देशमुख व तांबोळी सर ,पवारवस्ती-कुसमोड शाळेचे सचिन गाटे सर यावेळेस प्रास्ताविक व सुञसंचालन सचिन गाटे सर यांनी केले ,महावीर धायगुडे यांनी मनोगत व्यक्त केले .तर विरबॅक कंपनीचे रिजनल मॅनेजर विजयकुमार कुंभार सर यांनी कुसमोड गावातील विद्यार्थ्यांना बॅचेस दिल्यामुळे आनंद झाला असुन भविष्यात सुद्धा आपण मदत करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळेस डाॅकटर सुरेश सातपुते यांनी बॅचेस मिळवुन दिल्याबद्दल तर पञकार संजय पाटील यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी संजय पाटील सर यांनी आभार मानले . फोटो _ कुसमोड येथील जिल्ह्य परिषद शाळांना बॅचेस लोकार्पण कार्यक्रमात बोलताना विजयकुमार कुंभार सर
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















