पंढरपूर – विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी पत्रकार अभिराज उबाळे, स्वागताध्यक्षपदी परवेज मुजावर यांची तर सचिवपदी कृष्णा सर्वगोड यांची निवड केली गेली.
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष विशाल भैया मांदळे, कार्याध्यक्ष महेश मोटे, कोषाध्यक्ष योगेश जाधव, सहसचिव अजिंक्य होवाळ, प्रसिद्धीप्रमुख सूरज साखरे, रूपेश वाघमारे, सहकोषाध्यक्ष स्वप्निल कांबळे, तर कार्यकारिणी सदस्य संजय सातपुते आणि राहुल भोरकडे यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती पंढरपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि २५ भीमजयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समितीचे मावळते अध्यक्ष शैलेश आगावणे होते.
या बैठकीला आरपीआयचे नेते जितेंद्र बनसोडे, तालुकाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक डी.राज सर्वगोड, चेअरमन संतोष सर्वगोड, रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड, उमेश सर्वगोड, आरपीआयचे शहराध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड, बहुजन हितकारिणी सभेचे रवी सर्वगोड, योगेश जाधव, अमित कसबे, अनिल ननवरे, विशाल मांदळे, अजिंक्य होवाळ, कनिष्क सर्वगोड, सतीश सर्वगोड यांच्यासह शहरातील २५ मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.




















