सोलापूर : भारतीय बौद्ध महासभेच्या पूर्व विभागाच्या वतीने समता सैनिक दलाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर गौतम नगर, गरिबी हटाव झोन क्र. १, विजापूर नाका येथील बुद्ध विहार येथे उत्साहात पार पडले. या शिबिराला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला व युवकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी सोलापूर शहर अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या नावाची सूचना प्रचार व पर्यटन प्रमुख धम्मपाल माने यांनी मांडली. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पूर्वचे महासचिव बाबासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला विभाग संघटिका शारदा गजभिये तसेच सोलापूर जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष दत्तात्रय सिद्धगणेश यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमास नंदा ताई काटे (जिल्हा पूर्व महिला सरचिटणीस), महिला संस्कार प्रमुख आम्रपाली सर्वगोड, माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, शहर समता सैनिक दल प्रमुख बाबू रणखांबे, जिल्हा संघटक प्रा. जगन्नाथ शिंगे, शहर उपाध्यक्ष अजय मोरे, महेंद्र काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरात केंद्रीय शिक्षक यशवंत साबळे व विजय साळवे यांनी समता सैनिक दलाच्या सैनिकांना परेडचे प्रशिक्षण देत संघटन, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले.शिबिरात गणेश कांबळे, नागेश चौरे, तुषार बनसोडे, आदित्य सुर्यवंशी, हर्षराज बनसोडे, अश्वजीत गायकवाड, नागिनताई साबळे, सोमनाथ गायकवाड, पुष्पाताई गायकवाड, आवाड यांसह अनेक सैनिक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समता सैनिक दल प्रमुख बाबू रणखांबे यांनी आभार मानले.

























