बार्शी – सर्वांनाच निरोगी, उत्साही आणि आनंदी जीवन जगण्यासाठी व्यायामाबरोबरच संतुलित आणि योग्य आहाराची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आहारतज्ञ कविता अंधारे यांनी केले. त्या लोकसेवा विद्यालय आगळगाव व सागर गरड यांच्या जनता न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशालेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गावातील महिला, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार चौधरी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधवर यू.एस. यांनी केले. यावेळी विजयश्री पाटील यांनी सर्वच क्षेत्रातील विकासात महिलांची भूमिका याविषयी सर्वांना मार्गदर्शन करुन तिचे महत्व पटवून दिले .यानंतर आगळगाव, उंबरगे, भोयरे, बेलगांव, धनगरवाडी, खडकोणी, भानसाळे येथील महिलांसाठी विद्यालयाच्यावतीने मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. या खेळातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या महिलांना पैठणी, मनगटी घड्याळ आणि हँड पर्स ही बक्षिसे देण्यात आली.मनोरंजक खेळातील विजेते- पैठणी विजेत्या- कोमल डमरे, मनीषा थिटे, दैवशाला शेटे. मनगटी घड्याळ विजेत्या- प्राजक्ता माने, सोनाली विधाते, भाग्यश्री लंगोटे.
पर्सच्या विजेत्या- धनश्री नलवडे, अश्विनी उकिरडे, सारिका डमरे. सरप्राइज खेळातील विजेत्या- सोनाली गरड व वर्षा कदम. सदर बक्षीसे बबन गडदे, बन गायकवाड, मुकेश डमरे,्यांनी दिली. कार्यक्रमाच यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील श्रीमती मोरे एस. डी., डॉ वंदना यादव, श्रीमती जाधवर यू. एस., श्रीमती अवतार एस.एम., श्रीमती एम.ए. लोखंडे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना यादव व आभार श्रीमती मोरे एस.डी. यांनी मानले.


























