सोलापूर – राज्यातील 300 पेक्षा जास्त खेळाडू पुणे महापौर राज्यस्तरीय श्री स्पर्धेत सहभागी होते. पुण्याच्या प्रथम नागरिक सौ मंजुषा ताई नागपुरे यांनी स्पर्धेचे उद घाटन केले . स्पर्धेचा विजेता कोल्हापूर चा अजिंक्य रेडेकर ठरला .
75 किलो गटातील विजेतेपद प्राप्त करत सोलापूरच्या इलिजियम् जिमच्य पंचाक्षरी लोणार ने अंतिम फेरीत प्रवेश केला . अटीतटीच्या लढतीत पंचाक्षरीने प्रगतिकारक खेळाडूंचा मान प्राप्त केला . नगरसेविका धनश्री ताई कोल्हे यांच्या शुभहस्ते लोणारला ट्रॉफी , रोख रक्कम देण्यात आली. सोलापूरचा युनूस शेख याने 70 किलो गटात पाचवा क्रमांक प्राप्त केला .
या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस विशाल गायकवाड, संजय हिरेमठ यांच्या सह महाराष्ट्रातील अनेक पंचांनी परीक्षण केले .
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार व सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी अभिनंदन केले .


























