Sunday, November 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपाचा स्थापना दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा करा – प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
भाजपाचा स्थापना दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा करा – प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : भाजपाचास्थापना दिवस ६ एप्रिल दिवाळी सणाप्रमाणे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा करण्याचे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे यांनी भाजपा जालना ग्रामीण व जालना महानगर च्या जिल्हा बैठकीत पदाधिकारी यांना केले. आज दि. ०१ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस तसेच SIR (मतदार यादी पुनरावलोकन) मोहिमेच्या अनुषंगाने मार्गदर्शन व आढावा घेण्यासाठी आज दि. 01 एप्रिल रोजी भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली, यावेळी भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायणभाऊ कुचे, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक आण्णा पांगारकर, विमलताई आगलावे, जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, सुनील पवार, गोविंद ढेंबरे, वसंत शिंदे, रमेश भापकर, अरुणाताई जाधव, अमोल कारंजेकर, युवा नेते अक्षय गोरंटयाल, नगरसेवक महावीर ढक्का यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना संजयजी कौडगे म्हणाले की, भाजपा स्थापना दिवस हा केवळ उत्सव नसून कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी दिवस आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात पोहोचून पक्षाची विचारधारा व सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवावी. ६ एप्रिल हा दिवस भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा, तसेच SIR मोहिमेच्या माध्यमातून मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी. बैठकीत ६ एप्रिल स्थापना दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. त्यानुसार ५ ते ७ एप्रिल दरम्यान सर्व कार्यालयांवर सजावट व रोषणाई करण्यात यावी, ६ एप्रिल रोजी ध्वजवंदन, मिठाई वाटप तसेच पक्षाचा इतिहास व कार्य याबाबत माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करावेत, तसेच ५ ते १२ एप्रिल दरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या घरांवर पक्षाचा झेंडा लावून सोशल मीडियावर प्रचार करावा, ८ व ९ एप्रिल रोजी मंडळस्तरावर सक्रिय कार्यकर्ता संमेलन घ्यावे, तर ७ ते १२ एप्रिल या कालावधीत गाव व वस्ती स्तरावर स्वच्छता अभियान, जेष्ठ मान्यवरांचा सन्मान, तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी आ.नारायणभाऊ कुचे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा. भाजपाला या निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या स्तरावर सक्रीय राहून पक्षाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असून, यासाठी घरोघरी संपर्क साधून जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भास्कर आबा दानवे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना SIR (मतदार यादी पुनरावलोकन) मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या दृष्टीने अचूक व अद्ययावत मतदार यादी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने व सक्रीय सहभाग नोंदवून नवीन मतदारांची नोंदणी, नावांमधील त्रुटी दुरुस्ती तसेच अपात्र नावे वगळणे यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सुशीलाताई दानवे, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, नारायण पवार, गणेश खवणे, शिवाजी बोबडे, शंकर लहामगे, परीक्षित शिंदे, महेश निकम, सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानुरे, भगवान मात्रे, विक्रम उफाड, गजानन नागवे, देविदास देशमुख, बाबासाहेब कोलते, शुभांगी देशपांडे, सकुबाई पणबिसरे, सोमेश काबलिये, अनिल सरकटे, सतीश केळकर, अर्जुन गेही, वीरेंद्रकुमार धोका, संतोष माधोवाले, विक्रांत ढक्का, कल्याण भदनेकर, पदमा मानधानी, सिद्धेश्वर हजबे, बाबुराव भवर, अलोक सरवडीकर, अजित मानधानी, गुलाब पानबिसरे, रोहित खोडवे, मनोजकुमार जोशी, रोहित भुरेवाल, आकाश देशमाने, मनोज इंगळे, निलेश गोर्डे, विकास कदम, आनंद वाघमारे, विष्णू डोंगरे, योगेश शिमगे, अक्षय राजगिरी, राजाराम जाधव, मुकेश चव्हाण, नारायण मोहिते, कैलास मोहिते, बद्रीनाथ वाघ, सतीश निर्वळ, राजु साळवे, एकनाथ मोरे, दिपक ठाकूर, कल्याण काळे, संपत टकले आदींची उपस्थिती होती.

 

Views: 70
Previous Post

मोहोळ तालुक्यातील वडवळच्या यात्रेची आजपासून सुरुवात

Next Post

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये विज्ञान अविष्कार प्रदर्शन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये विज्ञान अविष्कार प्रदर्शन

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये विज्ञान अविष्कार प्रदर्शन

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांवर डॉ. पृथ्वीराज माने आक्रमक; प्रशासनाच्या कार्यवाहीचा मागितला हिशेब!

November 7, 2026

चिंचणी, उंदरगाव, चिणकेची राज्यस्तरीय कामगिरी; अनुक्रमे ५०, ३० आणि २० लाखांची बक्षिसे तभा वृत्तसेवा,

November 7, 2026
सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

November 7, 2026
३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

November 7, 2026
नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

November 7, 2026
सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

November 7, 2026
मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

November 7, 2026
राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1477307

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!