जालना : भाजपाचास्थापना दिवस ६ एप्रिल दिवाळी सणाप्रमाणे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा करण्याचे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे यांनी भाजपा जालना ग्रामीण व जालना महानगर च्या जिल्हा बैठकीत पदाधिकारी यांना केले. आज दि. ०१ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस तसेच SIR (मतदार यादी पुनरावलोकन) मोहिमेच्या अनुषंगाने मार्गदर्शन व आढावा घेण्यासाठी आज दि. 01 एप्रिल रोजी भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली, यावेळी भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायणभाऊ कुचे, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक आण्णा पांगारकर, विमलताई आगलावे, जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, सुनील पवार, गोविंद ढेंबरे, वसंत शिंदे, रमेश भापकर, अरुणाताई जाधव, अमोल कारंजेकर, युवा नेते अक्षय गोरंटयाल, नगरसेवक महावीर ढक्का यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना संजयजी कौडगे म्हणाले की, भाजपा स्थापना दिवस हा केवळ उत्सव नसून कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी दिवस आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात पोहोचून पक्षाची विचारधारा व सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवावी. ६ एप्रिल हा दिवस भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा, तसेच SIR मोहिमेच्या माध्यमातून मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी. बैठकीत ६ एप्रिल स्थापना दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. त्यानुसार ५ ते ७ एप्रिल दरम्यान सर्व कार्यालयांवर सजावट व रोषणाई करण्यात यावी, ६ एप्रिल रोजी ध्वजवंदन, मिठाई वाटप तसेच पक्षाचा इतिहास व कार्य याबाबत माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करावेत, तसेच ५ ते १२ एप्रिल दरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या घरांवर पक्षाचा झेंडा लावून सोशल मीडियावर प्रचार करावा, ८ व ९ एप्रिल रोजी मंडळस्तरावर सक्रिय कार्यकर्ता संमेलन घ्यावे, तर ७ ते १२ एप्रिल या कालावधीत गाव व वस्ती स्तरावर स्वच्छता अभियान, जेष्ठ मान्यवरांचा सन्मान, तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी आ.नारायणभाऊ कुचे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा. भाजपाला या निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या स्तरावर सक्रीय राहून पक्षाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असून, यासाठी घरोघरी संपर्क साधून जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भास्कर आबा दानवे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना SIR (मतदार यादी पुनरावलोकन) मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या दृष्टीने अचूक व अद्ययावत मतदार यादी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने व सक्रीय सहभाग नोंदवून नवीन मतदारांची नोंदणी, नावांमधील त्रुटी दुरुस्ती तसेच अपात्र नावे वगळणे यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुशीलाताई दानवे, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, नारायण पवार, गणेश खवणे, शिवाजी बोबडे, शंकर लहामगे, परीक्षित शिंदे, महेश निकम, सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानुरे, भगवान मात्रे, विक्रम उफाड, गजानन नागवे, देविदास देशमुख, बाबासाहेब कोलते, शुभांगी देशपांडे, सकुबाई पणबिसरे, सोमेश काबलिये, अनिल सरकटे, सतीश केळकर, अर्जुन गेही, वीरेंद्रकुमार धोका, संतोष माधोवाले, विक्रांत ढक्का, कल्याण भदनेकर, पदमा मानधानी, सिद्धेश्वर हजबे, बाबुराव भवर, अलोक सरवडीकर, अजित मानधानी, गुलाब पानबिसरे, रोहित खोडवे, मनोजकुमार जोशी, रोहित भुरेवाल, आकाश देशमाने, मनोज इंगळे, निलेश गोर्डे, विकास कदम, आनंद वाघमारे, विष्णू डोंगरे, योगेश शिमगे, अक्षय राजगिरी, राजाराम जाधव, मुकेश चव्हाण, नारायण मोहिते, कैलास मोहिते, बद्रीनाथ वाघ, सतीश निर्वळ, राजु साळवे, एकनाथ मोरे, दिपक ठाकूर, कल्याण काळे, संपत टकले आदींची उपस्थिती होती.




















