सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल,हत्तुरे नगर, सोलापूर येथे अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन सोलापूर आणि एम.आय.टी. विश्व प्रयाग युनिव्हर्सिटी केगाव,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान अविष्कार प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे, मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,विनायक हत्तुरे, क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके व प्रमुख अतिथी अगस्त्या फाउंडेशनचे बालाजी चौगुले(IMT)व टीचर इंदिरा पांढरे,पूजा गुंड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथींचे शाल व ग्रंथ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच या प्रदर्शनातील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनाही आकर्षक बक्षीस देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
या प्रदर्शनात एकूण 25 मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी अगस्त्या टीचर इंदिरा पांढरे यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा मुख्य हेतू सांगत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश दिंडोरे यांनी सहभागी विद्यार्थी,बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल तयार करावे असे सांगितले.
याप्रसंगी बसवराज कोरे, भारत राऊत, अनिलकुमार गावडे, संतोष स्वामी,अनिता हौदे, प्रिया पसारे, प्रतीक्षा बिडवे, सोमेश बनजगोळे आदी शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा गुंड यांनी केले,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आगवणे यांनी केले,शेवटी आभार प्रदर्शन महादेव जगताप यांनी केले.


















