सोलापूर – जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे जगा आणि जगू द्या असा संदेश देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव सोलापुरात मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी भगवान महावीर चौक येथील चौकातील फलकाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर आचार्य शांतीसागर चौकातील कीर्ती स्तंभाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन भाई शहा, राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभुते, महावीर नळे, प्रशांत वर्धमाने, देवेंद्र षटगार, कोमल पाचोरे, मंजुनाथ खोबरे, मनोज चवरकर, सोहन पाटील, यश पाटील, ओम पाटील, सुरज वसाळे, वालचंद पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी भारतीय जैन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या जन्मकल्याणक महोत्सवात उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी जैन समाजाच्या अडचणीला प्राधान्य देण्याचे त्यांनी आश्वासन दिले तर आचार्य शांतीसागर चौकातील कीर्ती स्तंभा जवळ ज्या काही अडचणी असतील या सुविधा पुरवायच्या असतील त्या बोर्ड मिटींग मध्ये मंजूर करून लवकरात लवकर सुविधा देण्याची त्यांनी आश्वासन दिले. यावेळी जैन सोशल ग्रुपचे संतोष भाऊ अतुल शहा संजय शहा गौतम संचेती अशोक छाजेड वैशाली पर्वत शर्वरी कोठारी याही पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाटील तर आभार प्रदर्शन अभिनंदन विभुते यांनी केले .

















