Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत दख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
April 2, 2026
in editor
0
‘चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत दख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर – ‘श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड जयघोषात, गुलालाच्या न्हाऊन निघालेल्या वातावरणात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथे जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य पालखी सोहळा बुधवारी   अमाप उत्साहात साजरा करण्यात आला.

सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता सुरु झाला. श्री. प्रविण डबाणे यांनी तोफेची सलामी दिल्यानंतर, विविध रंगी सुगंधी फुलांनी सजवलेली पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी एकाच वेळी गुलाल आणि खोबऱ्याची उधळण केली. ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि डोंगर चैतन्यमयी ‘गुलालमय’ झाला.

मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा गजगतीने मूळमाया यमाईदेवीच्या मंदिराकडे रवाना झाला. मार्गावर भाविकांनी पालखीवर गुलाल व खोब-यांची उधळण करत दर्शन घेतले. यमाई मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर तिथे यमाईदेवीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी करण्यात आलेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता.

रात्री पालखी सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात परतला. पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी आणि केदार डवरी यांनी पारंपारिक डवरी गीते सादर केली. या गायनानंतर पालखीने मुख्य मंदिरात प्रवेश केला आणि सोहळ्याची सांगता झाली.

      पावसाची हजेरी आणि प्रशासकीय दक्षता

दरम्यान, दुपारी ४ च्या सुमारास जोतिबा डोंगर परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसात चिंब भिजूनही भाविकांचा उत्साह कायम होता. पावसामुळे रस्त्यावर साचलेला गुलाल आणि चिखलामुळे निर्माण झालेली निसरडी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या, जेणेकरुन भाविकांना चालताना कोणताही त्रास होणार नाही. जिल्हा शासनाच्यावतीने यात्रेनिमित्त चोख बंदोबस्त आणि सुविधा पुरवण्यात आल्या असून भाविकांनी शांततेत दर्शन घेतले.

     ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रकल्प

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा यात्रेसाठी दरवर्षी ७ ते ८ लाख भाविक सलग हजेरी लावतात. लाखो भाविकांना जोतिबाचे दर्शन अधिक सुरक्षित आणि सुखकर पद्धतीने घेता यावे, या अलोट गर्दीचे चोख नियोजन करण्यासाठी आणि भाविकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंदा ‘आयआयटी मंडी’च्या तज्ज्ञांच्या मदतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रकल्प राबवला. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे यात्रेतील गर्दीवर सलग लक्ष ठेवणे आणि वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य झाले.

जोतिबाच्या गायमुख परिसरात वीज कोसळून सात भाविक जखमी झाले. पावसामुळे ते आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सोलापूरच्या जोतिबा भक्त मंडळाकडून अन्नदान

सोलापूर येथील श्रीक्षेत्र जोतिबा भक्त मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवस अन्नदान करण्यात आले. या मंडळातर्फे दर रविवारी व पौर्णिमेलाही अन्नदान केले जाते. हे अन्नदान सचिव रमेश शिंदे व खजिनदार अरुण बळप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

Post Views: 160
Previous Post

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री शिवचरित्राचे सामूहिक पारायण

Next Post

श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोहळा

श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोहळा

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1208000

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!