सोलापूर – दक्षिण तालुक्यातील कुंभारी येथील मड्डी वस्ती येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर ‘जय हनुमान’च्या घोषणांनी दुमदुमून गेला असून भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
हनुमान जयंतीनिमित्त पाळणा कार्यक्रम, दीपोत्सव तसेच महाप्रसाद वाटप यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती. सायंकाळी दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघाला, तर पाळणा कार्यक्रमाने उत्सवाला विशेष रंगत आणली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद अंदोडगी पाटील, प्रकाश कटारे, प्रशांत जमादार, रेवणसिद्ध छपेकर, नागनाथ कटारे, लक्ष्मण कटारे, रेवन मेंगले , ओंकार छपेकर, पिंटू परदेशी, सिद्धाराम अकोले, सागर थोंटे, विठ्ठल शिंदीबंदे, सागर साखरे, शाहरुख शेख, रवी नसारे, मनोज हुलसुरे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पार पडला.
यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी भजन-कीर्तन आणि नामस्मरणाच्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
















