सांगोला – भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कै.बी.जी.देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२५-२६ मध्ये सांगोला येथील प्रा.राजेंद्र मधुसूदन ठोंबरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मंत्रालय, सहावा मजला येथील परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार तसेच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या स्पर्धेत ३०० हून अधिक स्पर्धकांनी आपले निबंध सादर केले होते. प्राप्त झालेल्या निबंधांमधून ७४ अत्युत्कृष्ट निबंधांची निवड करण्यात आली, ज्यातून अंतिम ४ विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रा.राजेंद्र ठोंबरे यांनी सोशल मीडिया: आव्हाने आणि संधी (मराठी) या विषयावर निबंध सादर केला होता. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.