सोलापूर : ऑल इंडिया मेगा फॅन्सचे प्रेसिडेंट तथा हैदराबाद येथील मेगास्टार चिरंजीवी ब्लड बँकेचे इन्चार्ज आर. स्वामीनायडू यांनी रविवारी सोलापुरातील दत्तनगर येथील जनसेना पक्षाच्या कार्यालयास भेट दिली. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा तेलुगू चित्रपटसृष्टीचे पॉवरस्टार पवनकल्याण यांनी काही वर्षांपूर्वी जनसेना या पक्षाची स्थापना केली आहे.
सोलापुरात पवनकल्याण यांचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. या चाहत्यांच्या पुढाकारातून अलीकडेच जनसेना पक्षाची सोलापुरात शाखा स्थापन करण्यात आली आहे. या पक्षाच्या माध्यमातून सोलापुरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. रविवारी ऑल इंडिया मेगा फॅन्सचे प्रेसिडेंट तथा हैदराबाद येथील मेगास्टार चिरंजीवी ब्लड बँकेचे इन्चार्ज आर. स्वामीनायडू यांनी जनसेना पक्षाच्या सोलापुरातील कार्यालयास भेट दिली.
यावेळी पक्षाचे श्रीनिवास बिटला, आनंद कोंडा, गणेश पोतन, श्रीनिवास कांखी, आनंद अवधूत, बालराज दोन्तूल पंतुलू, बसवराज कटारी, नागेश पासकंटी, आदींनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले. सोलापुरात जनसेना पक्षाच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य उभारल्याबद्दल स्वामीनायडू यांनी कौतुक केले. भावी काळात या पक्षासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचनदेखील त्यांनी दिले.

























