अकलूज – अहिंसा, सत्य व अपरिहग्रह हे भगवान महावीरांचे सिद्धांत संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी आहेत. धर्मप्रभावनेसाठी कार्य करणाऱ्या सन्मती सेवा दलाचे कार्य हे समाजभिमूख व कौतुकास्पद असल्याचे मत उच्चरणाचार विनम्र सागरजी महाराज यांनी व्यक्त केले.
श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था व सकल जैन समाज यांच्या वतीने सोलापूर, पुणे, सातारा, धाराशिव, नगर, बीड, मुंबई या सात जिल्ह्यांचा सामूहिक भगवान महावीरांचा २६२५ वा जन्म कल्याणक प्रभावना महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना आचार्य विनम्र सागरजी बोलत होते.
कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, ईश्वरीदेवी मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील, भारत वर्ष दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी, समाजातील मान्यवर, दातार, सेवा दलाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आ. रणजीतसिंह मोहिते पाटील म्हणाले, भगवान महावीरांचे विचार व त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आपण सर्वानी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. नवीन मंदिर उभारणी बरोबरच हजारो वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तू व मंदिराचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. महावीर स्तंभ ते नवीन स्टॅन्ड पर्यंतच्या मार्गाला आचार्य शांतीसागर महाराजांचे नाव देण्याची समाजाने केलेल्या मागणीला नगरपरिषदेने मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
प्रस्ताविकात आयोजक मिहीर गांधी म्हणाले, जैन धर्मप्रभावने बरोबरच ग्रामीण व शहरी भागातील जैन बांधवांच्या वैचारिक धार्मिकतेची दरी कमी व्हावी, समस्या, अडचणी यावर विचार मंथन व्हावे यासाठी सेवादल गेली त१३ वर्ष एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील जैन समाजाची एकत्रित सामूहिक भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावना महोस्तव आयोजित करते.
उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष इंद्रराज दोशी यांनी केले. प्रारंभी सकाळी परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ५१ घोडे, ढोल पथक, चित्ररथ, धर्मरथ, गजरथ, हलगी लेझीम पथकाचाही सहभाग होता.
या पथकांनी परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध केले. दोन दिवसाच्या कार्यात सहभागी असणारे विविध महिला मंडळे, सामाजिक संस्था, पथके, विविध स्पर्धेतील विजेते यांचा सन्मान उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. पंचक्रोशीतील हजारो
















