सांगोला – सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ तथा सुटा या प्राध्यापक संघटनेच्या महाविद्यालयीन पातळीवरील पदाधिकारी निवडणूका सांगोला महाविद्यालयामध्ये पार पडल्या.
यावेळी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रामचंद्र पवार यांची अध्यक्ष, मराठी विभागातील प्रा.संतोष लोंढे यांची सचिव तर रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा.डॉ.बबन गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
ही निवड २०२६ ते २०२८ अशी तीन वर्षासाठी असेल. विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू अशी प्रतिक्रिया नूतन पदाधिकारी यांनी याप्रसंगी दिली.

















