पंढरपूर – व्यापारी महासंघ व व्यापारी कमेटी यांच्या वतिने नविन आयकर कायदा २०२५ हा १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला असून या नविन कायद्याची माहीती व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांना व्हावी यासाठी कर्मयोगी सभागृह अर्बन बॅंक पंढरपूर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजीत केले होते.
पुणे विभागाचे अॅडीशनल कमिशनर (इन्कम टॅक्स)श्री. राजेश गवळी (आयआरएस ) यांनी सुमारे एक तासांहून अधिक वेळात नविन कायद्या बाबत सविस्तर मार्गदर्शन करून व्यापारी बांधवांनी टॅक्स रिटन भरताना आपल्या उत्पन्नाची माहीती भरावी व आपल्या निव्वळ उत्पन्नातील खारीचा वाटा टॅक्स रूपाने राष्ट्राच्या विकासासाठी देण्याचे आवाहन केले, तरूण व्यापारी उद्योजकांनी आयकर विभागाच्या वेबसाईट व पोर्टल वरून आपल्याला हव्या त्या भाषे मधुन माहीती घेऊन राष्ट उभारणीच्या कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन राजेश गवळी यांनी केले.
या कार्यक्रमास पंढरपूर अर्बन बॅंकेचे चेअरमन सतिश मुळे,बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, इन्कम टॅक्स सोलापूरचे डेप्युटी कमिशनर सुभाष पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर,सचिव शिरीष पारसवार,सी.ए.संजिव कोठाडीया,संजय अभ्यंकर,बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे,महावीर फडे, रा.पा.कटेकर,राजगोपाल भट्टड, दिपक शेटे,आदि मा न्यवर व व्यापारी उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते.




















