सांगोला – पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात पार पडलेला युवा संकल्प महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सांगोल्यातील संकेत ठोंबरे यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीत भूषण पुरस्कार, प्रा.राजेंद्र ठोंबरे यांना समाजकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल समाज रत्न भूषण पुरस्कार तसेच मनीषा ठोंबरे यांना साहित्य क्षेत्रातील लेखनाबद्दल साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
युवा प्रबोधन साहित्य मंच, संकल्प बहुद्देशीय संस्था आणि ग्रामीण युवा बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. एकाच कुटुंबातील तिघांना त्यांच्या स्वतंत्र योगदानासाठी एकाच वेळी सन्मानित होणे ही दुर्मीळ आणि प्रेरणादायी घटना आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ठोंबरे परिवाराचे कौतुक केले. या यशाबद्दल ठोंबरे कुटुंबाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




















