अक्कलकोट – येथील श्री राहुल भरतकुमार आळंद यांच्या फार्म हाऊसवर पद्मासन मुद्रेत विराजमान होणाऱ्या भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ यांच्या ३१ फुटी भव्य प्रतिमेचा शिलान्यास व भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा मंगल सोहळा परमपूज्य गुरुदेव पट्टाचार्य श्री १०८ विशुद्धसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि मुनीश्री सुप्रभसागरजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात पार पडला. कोल्हापूर मठाधिपती स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. जन्मेजयराजे भोसले (संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ), मा. श्री. मिलनदादा कल्याणशेट्टी (नगराध्यक्ष, अक्कलकोट), मा. श्री. अमोलराजे भोसले (कार्यकारी विश्वस्त, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ), श्री. अभय शेठ खोबरे (जैन समाज, अक्कलकोट), श्री. अनिलजी जमंगे श्री. संकेत शहा, प्रतिष्ठाचार्य मुकेश शास्त्री, श्री. नागेश चौगुले यांच्यासह सोलापूर व अक्कलकोट येथील सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——
Views: 5