सांगोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागांतर्गत संशोधिका प्रा.डॉ.सोनल शशिकांत भुंजे यांना नुकतीच पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कृषी निविष्ठांच्या वापराचा कल आणि त्याचा शेती उत्पादकतेवर होणारा परिणाम या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांच्या या संशोधनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेती, खते, बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा उत्पादकतेवर कसा परिणाम होतो यावर महत्त्वपूर्ण प्रकाश पडला आहे. त्यांनी हे संशोधन डॉ.एस.एन.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
दि.११ मार्च रोजी विद्यापीठात झालेल्या मौखिक परीक्षेत त्यांनी आपल्या प्रबंधाचे यशस्वी सादरीकरण केले. त्यानंतर दि.६ एप्रिल रोजी त्यांना अधिकृतपणे ही पदवी जाहीर करण्यात आली. हे यश संपादन करण्यासाठी आई-वडील, भाऊ यांचे पाठबळ तसेच सांगोला महाविद्यालय या संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, ता.ना.केदार, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, पती ऋषिकेश गुळमिरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले असल्याचे प्रा.डॉ.सोनल भुंजे यांनी सांगितले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




















