श्रीपूर – शेवरे ता. पंढरपूर येथे कायदेशीर सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामस्थांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी व त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती व्हावी हा होता.
कार्यक्रमाचे आयोजन कर्मवीर औदुंबर पाटिल लॉ कॉलेजच्या प्राचार्य सौ.सुरांजली सोनकांबळे व प्राध्यापिका भक्ती दुधाते यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कायद्याचे ज्ञान घेत असलेल्या जुनिअर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा . सुरांजली सोनकांबळे यांनी केले . विविध कायदे विषयांवर मार्गदर्शन करताना विशेषतः महिलांचे हक्क, बालविवाह प्रतिबंध, घरगुती हिंसाचार कायदा, तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार यांविषयी सविस्तर माहिती दिली .
तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, लहान वयात विवाह न करण्याचे फायदे आणि स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक राहण्याचे मार्गदर्शन प्रा . भक्ति दुधाते यांनी केले . शिबिरात जुनिअर विद्यार्थांचा चांगला सहभाग लाभला. प्रत्येकाच्या प्रश्नांना सोप्या भाषेत समर्पक उत्तरे मिळल्याने शंकाचे निरसन झाले .
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य माजी विद्यार्थी अॅड. भारत मास्के यांचे लाभले .
उपस्थित सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार प्रा . भक्ति दुधाने यांनी मानले .

















