बार्शी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीमनगर येथील बौद्ध विहार येथे समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी भीम टायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आर.पी.आय. (आठवले) तसेच बहुजन हिताय मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बार्शी यांच्यावतीने बौद्ध विहाराला ६ सीलिंग फॅन भेट देण्यात आले.
कार्यक्रमावेळी भीम टायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक शंकर वाघमारे, आर.पी.आय. (आठवले) गटाचे शहराध्यक्ष ॲड. अविनाश गायकवाड, बहुजन हिताय मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक ॲड. प्रसन्नजीत नाईकनवरे, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे तालुका अध्यक्ष सनी गायकवाड यांच्यासह दीपक काकडे, मक्रोज बोकेफोडे, अशोक बोकेफोडे, दीपक बोकेफोडे, राजेंद्र कदम, दयावान लंकेश्वर, ॲड. धीरज कांबळे, अभिषेक अय्यर, वैभव काकडे, निलेश वाघमारे, भालचंद्र राजगुरु, कपिल बोकेफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकर वाघमारे यांनी सांगितले की, बार्शीतील कोणत्याही बौद्ध विहारास काहीही गरज भासल्यास त्यांनी आमच्या तिन्ही संघटनांशी संपर्क साधावा. तसेच पुढील उपक्रम म्हणून भीमनगर येथील बौद्ध विहाराच्या पहिल्या मजल्यावर मोफत अभ्यासिका सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या उपक्रमामुळे बौद्ध विहारातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून, उपस्थितांनी संस्थांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. दीपक बोकेफोडे यांनी संस्थांच्या कार्याचे विशेष कौतुक व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.



























