बार्शी – विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते सुनिल चौधरी, प्रमुख पाहुणे नानासाहेब शिंदे तर प्रमुख उपस्थिती सचिन चौधरी, समाधान चौधरी होते.
प्रमुख पाहुणे नानासाहेब शिंदे, सुनिल चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे महापुरुषांचे पुस्तक व गुलाब देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे वेळी संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागळात पोहचले पाहिजेत. शिका , संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला. बाबासाहेबानी सर्व घटकासाठी कार्य केले. आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. भीम जयंती ही विचारांची साजरी झाली पाहिजे. आपल्या देशाला सर्वात मोठी राज्यघटना दिली. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, किरण खुरंगळे, सचिन चौधरी, सुमित माळी, अधिरा चौधरी, दिपाली चौधरी, रंजना खुरंगळे, सुनिल चौधरी, समाधान चौधरी, नाना शिंदे, इतर मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी तर सूत्रसंचालन अभार प्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.

















