बार्शी – येथील सुयश विद्यालयामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
यावेळी शाळेचे संस्थापक शिवदास नलावडे, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप तसेच उपमुख्याध्यापक येवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व शिक्षकवृंदही या कार्यक्रमात उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थापक शिवदास नलावडे यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, समानतेचा संदेश आणि समाजातील परिवर्तनासाठी आंबेडकरांच्या विचारांचे अनुसरण करण्याची गरज यावर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थितांना नवी ऊर्जा व दिशा मिळाली.
















