Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने संपन्न झाला. दिवसभर पुण्यतिथी महोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर सायंकाळी साडे पाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने प्रारंभ झाला. प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब, सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूरचे उद्योजक राणा सुर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद, येथून आलेल्या वारकरी दिंडया, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला होता. शहरातील चौका चौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या निमीत्ताने संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

       पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले. फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. आज स्वामी पुण्यतिथी निमित्त आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन 

कल्याणशेट्टी, मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदीसह विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते, त्यामुळे अक्कलकोट शहरातील रस्ते गर्दीमुळे फुलून गेले होते.

      यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजय दास, नगरसेवक अविनाश मडीखांबे, महेश हिंडोळे, खाजप्पा झंपले, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, पिंटू साठे, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, प्रा.शिवशरण अचलेर, संजय बडवे, 

शीवा जमगे, बाळासाहेब एकबोटे, दर्शन घाटगे, रमेश शिंदे सर, प्रसाद पाटील सर, अमर पाटील, अंजय फुटाणे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे, श्रीनाथ महामूरे, अक्षय सरदेशमुख, काशिनाथ गुरव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, मंगेश फुटाणे, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, संजय पवार, प्रसाद सोनार, मोहन जाधव, प्रसाद पाटील, नितीन शिंदे, गणेश दिवाणजी, किरण किरात, योगेश पवार, संजय बडवे, रवी मलवे, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी, गोकुळ गवंडी, सुनील गवंडी, आदीत्य गवंडी, सुनिल पवार, बंडेराव घाटगे, लक्ष्मण घंटे, स्वामीराव मोरे, अशोक घंटे, प्रशांत गुरव, ज्योती जरीपटके, सुवर्णा जाधव इत्यादींसह देवस्थानचे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी व सेवेकरी आदींसह शहरातील व परगावाचे अनेक स्वामी भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

फोटो ओळ – पालखी मिरवणूक प्रस्थान प्रसंगी चेअरमन महेश इंगळे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, मंदार महाराज पुजारी, अमोलराजे भोसले व इतर मान्यवर व भाविक दिसत आहेत.

Post Views: 12
Previous Post

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; ‘अनार्या’ ९६. २० टक्के गुण मिळवून टॉपर

Next Post

निस्वार्थ स्वामी सेवा मंडळा तर्फे भाविकाना प्रसाद वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
निस्वार्थ स्वामी सेवा मंडळा तर्फे भाविकाना प्रसाद वाटप

निस्वार्थ स्वामी सेवा मंडळा तर्फे भाविकाना प्रसाद वाटप

ताज्या बातम्या

यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

April 17, 2026
विधानसभेच्या वाढणाऱ्या जागांमुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसला अनुकूलता

विधानसभेच्या वाढणाऱ्या जागांमुळे बार्शी तालुक्यात काँग्रेसला अनुकूलता

April 17, 2026
माढ्यात नगरपंचायतने गाळेधारकांचे अतिक्रमण काढले

माढ्यात नगरपंचायतने गाळेधारकांचे अतिक्रमण काढले

April 17, 2026
महेश सदाफुले यांचे शुभकामना चित्र प्रदर्शन चे थाटात उद्घाटन संपन्न

महेश सदाफुले यांचे शुभकामना चित्र प्रदर्शन चे थाटात उद्घाटन संपन्न

April 17, 2026
सभापती संस्कृती सातपुते ऑन फील्ड ! दलितवस्ती विकास कामांचा कार्यालयात घेतला आढावा

सभापती संस्कृती सातपुते ऑन फील्ड ! दलितवस्ती विकास कामांचा कार्यालयात घेतला आढावा

April 17, 2026
माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

April 17, 2026
झाडी येथे एकता महिला मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

झाडी येथे एकता महिला मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0814222

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697