Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ऐतिहासिक अष्टकोनी हत्ती तलावाला नवे जीवन; पानगावात ग्रामस्थांचे श्रमदानातून पुनरुज्जीवन

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
ऐतिहासिक अष्टकोनी हत्ती तलावाला नवे जीवन; पानगावात ग्रामस्थांचे श्रमदानातून पुनरुज्जीवन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – तालुक्यातील पानगांव येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या अष्टकोनी हत्ती तलावाने अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारातून व विशेषतः तरुणांच्या श्रमदानातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे तलावाचे मूळ रुप पुन्हा उजागर झाले असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतिहासकालीन महत्त्व लाभलेल्या पानगाव गावाला स्वराज्याच्या परंपरेशी घट्ट नाते आहे. स्वराज्याचे पाचवे छत्रपती रामराजे महाराज हे इ.स. १७४५ ते १७५० या कालावधीत पानगाव येथे गुप्तपणे वास्तव्यास होते. येथूनच त्यांनी ४ जानेवारी १७५० रोजी सातारा येथे जाऊन छत्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यामुळे पानगावला ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

तसेच छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या नात असलेल्या दर्याबाई साहेब नाईक-निंबाळकर यांचे सासरही पानगाव येथेच आहे. त्यांचे पती निंबाजीराव नाईक निंबाळकर हे स्वराज्याचे सरसेनापती होते. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थितीत रामराजे महाराज यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पानगाव येथे गुप्तपणे ठेवण्यात आल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक नामांकित सरदार घराण्यांचा वावरही या गावात होता.

पानगावमध्ये आजही भव्य वेस, अष्टकोनी तलाव, ऐतिहासिक समाधी स्थळे आणि प्राचीन बारव यासारखी वास्तू अस्तित्वात आहेत. त्यापैकी सुमारे तीन एकर परिसरात पसरलेला अष्टकोनी हत्ती तलाव हा काळ्या बेसाल्ट दगडातून घडविण्यात आलेला एक अद्वितीय वारसा आहे. पूर्वी हत्तींना जलविहारासाठी या तलावाचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले जाते.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे तलाव परिसरात काटेरी झुडपे, वेली आणि गवत मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यामुळे तलाव पूर्णतः झाकोळला गेला होता आणि त्याच्या दगडी बांधकामालाही धोका निर्माण झाला होता.

ही स्थिती लक्षात घेऊन गावातील २०० हून अधिक तरुणांनी एकत्र येत श्रमदानातून व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. झाडे-झुडपे, वेली हटवून तलाव परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक दशकांनंतर प्रथमच तलावाचे मूळ सौंदर्य सर्वांसमोर आले असून त्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा खुलून दिसत आहे.

Post Views: 11
Previous Post

परदेशातून उच्चशिक्षित एम्समधील कार्डिओलॉजिस्ट आता सोलापूरमध्ये

Next Post

झाडी येथे एकता महिला मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
झाडी येथे एकता महिला मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

झाडी येथे एकता महिला मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

आरती सोनवणे यांची न्यायाधीश पदी निवड

April 17, 2026

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

माहेरी का राहते या रागातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

April 17, 2026

मंठा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

April 17, 2026

मंठा येथे सुरज जिनिंगला भीषण आग ; कापूस जळून मोठे नुकसान

April 17, 2026

ग्रामपंचायतीवर थेट घागर मोर्चा ; महिलांचा संताप अनावर

April 17, 2026
यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0814413

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697