जेऊर – सिनियर केजी मधील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आकर्षक कॅप व गाऊन परिधान करून आत्मविश्वासाने मंचावर प्रवेश केला आणि आपल्या शालेय जीवनातील पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचा अभिमानाने उत्सव साजरा केला. कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य सोनाली तकिक, संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश बिले यांनी
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून केली. या कार्यक्रमासाठी स्कूल संचालिका डॉक्टर स्वाती बिले तसेच मुख्याध्यापिका अमृता परदेशी उपस्थित होत्या.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच छोटेखानी भाषणांमधून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणि आत्मविश्वास प्रभावीपणे दाखवून दिला. विशेषतः ‘ग्रॅज्युएशन वॉक’ हा कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू ठरला, ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. आपल्या मुलांचा आत्मविश्वास, प्रगती आणि सादरीकरण पाहून पालक भावुक झाले तसेच त्यांनी शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांच्या परिश्रमांमुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि सुसूत्र आयोजन शाळेच्या नीलिमा आढाव, शुभांगी बरडे, अर्चना कादगे शिक्षकवृंदाने उत्कृष्टरीत्या पार पाडले. नीलिमा आढाव यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकूणच हा ग्रॅज्युएशन डे सोहळा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत आनंददायी, प्रेरणादायी आणि कायम स्मरणात राहणारा ठरला.



















