जेऊर – करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळके वस्ती दहिगाव शाळेला वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मरवडे येथील छत्रपती परिवाराच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळा जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे झाला.
शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे,विजय कोंबे तसेच माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे व माजी आ.दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,मानपत्र,फेटा,शाल देऊन गौरव करण्यात आला यावेळी दहिगाव सोसायटीचे चेअरमन हरिश्चंद्र आबा शेळके शेळके वस्ती शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतीराम दादा पाडुळे उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे महादेव कोंडलकर निवृत्त आदर्श शिक्षक श्री दस्तगीर शेख शाळेचे मुख्याध्यापक विजय राऊत व सहकारी शिक्षिका उर्मिला गंभीरे मॅडम आदी उपस्थित होते.






















