अक्कलकोट – एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल यंदा शंभर ( १०० ) टक्के लागला असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखण्यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
या निकालात प्रतीक शिवणगी याने ९१.८० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. आयेशा चौधरी हिने 86.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर आर्या मिठारी हिने 85 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, सेक्रेटरी सुभाष धरणे, संचालिका पवित्रा खेडगी, प्राचार्य वेंकटेश बक्षी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

























