सोलापूर – शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव च्या विद्यार्थ्यांचा सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत याही वर्षी १००% निकाल लावण्याची परंपरा अबाधित राखली आहे.
सीबीएससी दहावी बोर्डाच्या परीक्षेत स्कूल मधील वीर बळवंत घोडके याने ९८% गुण मिळवत प्रथम क्रमांक, स्वरित सुधीर नांदेडकर ९७.६०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक सोहम बालाजी दंडनाईक यांनी ९७.४०% गुण मिळवले.
या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये एकूण ११५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, त्यापैकी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेले एकूण ३७ विद्यार्थी, तर ८० ते ९०% गुण मिळवलेले एकूण १९ विद्यार्थी, ७० ते ८०% गुण मिळवलेले एकूण ३२ विद्यार्थी, ६० ते ७०% गुण मिळवलेले विद्यार्थी एकूण १९ विद्यार्थी पात्र ठरले.
या निकालाबद्दल स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिले आहेत.

























