कुर्डूवाडी – आदर्श सैनिक स्कूलमध्ये ड्रिल स्पर्धा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, नेतृत्वगुण आणि देशभक्तीची भावना विकसित करणे हा होता.
ड्रिल स्पर्धेत सर्व हाऊसने उत्कृष्ट सादरीकरण केले, मात्र सूर्या हाऊसने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि संघभावनेचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.परीक्षक म्हणून अरबाज मुलानी व अमीर मुलानी यांनी काम पाहिले.
यानंतर विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये शैक्षणिक पुरस्कार, बेस्ट कॅडेट पुरस्कार, बेस्ट ट्रूप लीडर, बेस्ट लीडरशिप पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, स्वच्छता पुरस्कार, हेल्पिंग हँड, शिस्त पुरस्कार, इंग्रजी संभाषण कौशल्य आणि सहशालेय उपक्रम पुरस्कार यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये दै. तरुण भारतचे सोमनाथ शिंदे, दै. पुढारीचे विनायक पाटील,दै. लोकमतचे लक्ष्मण कांबळे, दिव्य मराठीचे शिरीष कुमार महामुनी व नितिन वाघमारे, सतीश महिंगडे ,अतुल गवळी,दै.पंढरी भूषणचे हर्शल बागल हे उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळेच्या व्यवस्थापनाचीही उपस्थिती लाभली. अध्यक्ष अमोल सुरवसे, व्यवस्थापकीय संचालिका सौ. पूजा सुरवसे आणि प्राचार्य राऊत बी. डी. यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.






















