सोलापुर : माजी आमदार धर्मवीर वि.रा. पाटील यांची 120 वी जयंती सोलापूर शहरातील सावरकर मैदान येथे साजरी करण्यात आली.
धर्मवीर आबांनी सोलापूर शहरात हिंदूंच्या सण-उत्सव मिरवणुका या आबांच्या आक्रमक पणामुळेच आज पाहायला मिळतात असे गौरव उद्गार यावेळी काढले व मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी आबांच्या तत्वनिष्ठ हिंदुत्ववादी विचार घेऊन आपण पुढे जाऊ असा संकल्प केल्याचे ट्रस्टी सुनील रसाळे यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी सुनील रसाळे, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, ट्रस्टी सचिव संजय शिंदे माजी उत्सव अध्यक्ष व मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, नंदकुमार उपाध्ये, जितेंद्र टेंभुर्णीकर, बाळासाहेब वाघमोडे, बाबुराव क्षीरसागर, ओंकार विभुते, सुनील स्वामी, दत्तात्रय जाधव, अमर मोरे, मुबारक शेख, दशरथ कोळी यांची उपस्थिती होती.


























