पंढरपूर – महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत १७ एप्रिल रोजी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव व रोपळे या मंडळातून १ हजार ६०६ विविध सेवा व विविध दाखले देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
या अभियानातंर्गत भंडीशेगाव व रोपळे येथील शिबिरात निकाली काढण्यात आलेले फेरफार १४०, सातबारा मधील दुरुस्ती १८, डिजिटल सातबारा २९२, ८ अ उतारे २५७, विविध दाखले ६४५, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकालात काढण्यात आलेले अर्ज १७, भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेली प्रकरणे ०६, सामाजिक योजना २, शिधापत्रिका ५२, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना ६०, आभा कार्ड एच.बी, तपासणी व औषधोपचार १५, ई- मोजणी फेरफार नकाशा १५,आदी सेवा व दाखले देण्यात आले. यामध्ये भंडीशेगाव मंडळातून ९३६ तर करकंब मंडळातून ६७० असे एकूण १ हजार ६०६ विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्याचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार सचिन लंगुटे होते.यावेळी जि.प. सदस्य मयुरी बागल, पं.स. सदस्य निखीलगिर गोसावी, प्रमिला झांबरे, विजया भोसले, महादेव जाधव, धाराशिव शगुरचे कार्यकारी संचालक अमर पाटील, जनक भोसले, सरपंच सुमन यलमार, निवासी नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड, महसूल नायब तहसिलदार दीपक शिंदे, सहा. महसूल अधिकारी दादा गावंदरे, मंडल अधिकारी दिनेश भडंगे, बाळासाहेब कदम आदीसह तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते.






















